ऑटोमॅटिक टाइमर डाऊनलोड लिंक कशी बनवतात.
Automatic download code :- click here
सर्वात ही लिंक कशी काम करते ते माहीत करून घेऊया.तर जेव्हा पण तुम्ही तुमचा वेबसाईट वर कोणतीही फाईल डाऊनलोड साठी देत असतात तर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही फाईल शेअरिंग प्लॅटफॉर्म वर फाईल अपलोड करून सहसा लिंक शेअर करतात पण जर तुम्हाला अशी लिंक हवी असेल जी १०/२० सेकंड नंतर ऑटोमॅटिक तुम्ही अपलोड केलेली फाईल डाऊनलोड होण्यास सुरवात होईल तर तुम्हाला गरज भासेल २ गोष्टींची :-
१. ड्रॉपबॉक्स
२. डाऊनलोड कोड
तर तुम्ही सर्वात आधी ड्रॉपबॉक्स वर तुमचे अकाऊंट ओपन करून घ्या तुम्ही गूगल अकाऊंट चा वापर करून त्यावर अकाऊंट ओपन करू शकतात .
अकाऊंट ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला ड्रॉपबॉक्स हे ऍप्लिकेशन / वेबसाइट ओपन करून घ्यायची आहे आणि ह्या वेबसाइट /ऍप्लिकेशन वर तुम्हाला ज्या फाईल ला डाऊनलोड साठी लिंक द्यायची आहे त्या फाईल ला अपलोड करायचे आहे .
फाईल अपलोड साठी खालील फोटो नुसार स्टेप फॉलो करा:-
१. ड्रॉपबॉक्स ऍप्लिकेशन ओपन करा.
२. + ह्या आयकॉन वर क्लिक करा.
३. अपलोड फाईल ऑप्शन निवडा.
४. अपलोड करण्यासाठी हवी ती फाईल निवडून घ्या.
तुमची फाईल अपलोड व्हायला सुरुवात होईल तर तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल.
फाईल अपलोड झाल्यानंतर तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील:-
१.फाईल चा साईड ला ३ डॉट असतील त्यावर क्लीक करा.
२. कॉपी क्लिंक ह्या ऑप्शन ला निवडा.
३.लिंक कॉपी झालेली असेल.
लिंक कॉपी झाल्यानंतर तुमचे काम संपलेले नाही तुम्हाला वरील डाऊनलोड बटनवर क्लीक करून एक कोडे मिळून जाईल त्याला नोट्स मध्ये कॉपी पेस्ट करून घ्या आणि पुढील स्टेप्स फॉलो करा.
१. नोट्स मध्ये डाऊनलोड केलेला कोडे कॉपी करून घ्या .
२. स्टार्ट द डाऊनलोड विंडो लोकेशन असे लिहिलेले वाक्य त्या कोड मध्ये शोधा.
३. त्यात " " ह्यांचा मधात तुम्ही कॉपी केलेली लिंक पेस्ट करा.
४.तुम्ही कॉपी पेस्ट केलेली लिंक =0 ने संपत असेल तो झीरो काढून तिथे =1 असे करा.
५.पूर्ण कोड कॉपी करा.
६.तुमचा वेबसाईट वर या.
५.न्यू पोस्ट /न्यू पेज मध्ये जा html व्ह्यू करून त्यात पूर्ण कोड पेस्ट करा.
६.तुमची ऑटोमॅटिक टाइमर डाऊनलोड लिंक तयार झालेली असेल.
आता त्या पेज ची / पोस्ट ची लिंक तुम्ही कुठे पण शेअर करून तुमची फाईल टायमर डाऊनलोड ने देऊ शकतात.
आमचा ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत नवनवीन टेक्निकल पोस्ट साठी भेट देत रहा धन्यवाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा